शनिवार, ४ जानेवारी, २०१४

कानडा हो विठ्ठलू...




इथे मी रूळ म्हणून ज्याचा वापर केलाय ते श्री. नरेंद्र साळसकरांचे गिटारवादन आहे...त्यांना माझ्यातर्फे खास धन्यवाद.

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥

पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥

बाप रखुमदेवीवरू हृदयीचा जाणूनी ।
अनुभवू सौरसू केला ।
दृष्टीचा डोळा पाहो गेले तव ।
भीतरी पालटू झाला ॥ ६ ॥


रचनाकार: संत ज्ञानेश्वर
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
गायिका: आशा भोसले

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

कृपया प्रत्येक ओवी नंतर त्या ओवीचा अर्थ पोस्ट करा

प्रमोद देव म्हणाले...

मी कीर्तनकार अथवा प्रवचनकार नाहीये...पण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महाजालावर शोध घेतला तेव्हा एका ठिकाणी हे स्पष्टीकरण मिळालंय.
खालील दुव्यावर भावार्थ दिलाय तो वाचा...
https://www.facebook.com/varkari.sampraday.samaj/posts/572565429495987