गुरुवार, ४ जुलै, २०१३

तुझे रूप चित्‍ती राहो...


तुझे रूप चित्‍ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम

गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीतकार आणि गायक: सुधीर फडके
चित्रपट : संत गोरा कुंभार

२ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, हे चांगलं जमलं राव.

प्रमोद देव म्हणाले...

आवर्जून ऐकून प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद, दिलीपराव!