शुक्रवार, ५ जुलै, २०१३

कोटी कोटी रूपे तुझी...



कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे

बीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणुनी देतो, फुलांना सुवास
चरा चरा रंगविसी, रंग तुझा कोणता रे?

कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी निर्जनी हि तुझा, पाय रोवलेला
तुझी खुण नाही ऐसा, गाव तरी कोणता रे?

खरे रूप देवा तुझे कोणते  कळेना
तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे?|

गीतकार: कवी यशवंत देव
संगीतकार: प्रभाकर जोग
गायक: सूरेश वाडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: