शुक्रवार, १२ जुलै, २०१३

बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला...



बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

चिमनी मैना, चिमना रावा
चिमन्या अंगणी, चिमना चांदवा
चिमनी जोडी, चिमनी गोडी
चोच लाविते, चिमन्या चार्‍याला
चिमनं, चिमनं, घरटं बांधलं, चिमन्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माजा जडला त्याच्या पायाला

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगुनि जीव रंगला
गोजिरवानी, मंजुळ गानी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: आनंदघन
गायिका: लता मंगेशकर
चित्रपट: मोहित्यांची मंजुळा