बुधवार, २० जून, २०१२

विकत घेतला श्याम...


नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा
हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम

जितुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी याची गावे
कुणी न ओळखी तरिही याला, दिन अनाथ अनाम

गीतकार:ग.दि.माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके,आशा भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: