शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

काळ देहासी आला खाऊं




काळ देहासी आला खाऊं ।
आह्मी आनंदें नाचूं गाऊं ॥१॥

कोणे वेळे काय गाणें ।
हें तों भगवंता मी नेणें ॥२॥

टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
माझें गाणें पश्चिमेकडे ॥३॥

नामा ह्मणे बा केशवा ।
जन्मोजन्मीं द्यावी सेवा ॥४॥

        रचना: संत नामदेव
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

पायो री मैं ने राम रतन

दादर्‍यातली रचना



भजनी ठेक्यातली रचना






पायो री मैं ने राम रतन धन पायो ॥

वस्तु अमोलिक दिजे मेरे सत्‌गुरू ।
कृपा करी अन्‌ पायो ॥

जनम जनम की पुंजी बांधी ।
जग में सभी खोवायो ॥

सत्‌ की नाव खेवटीया सत्‌गुरू ।
भवसागर तर आयो ॥

मीरा कहे प्रभु गिरिधर नागर ।
हरख हरख जस गायो ॥

         रचना: संत मीराबाई
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

जेव्हा तुझ्या बटांना



ह्या गीताला सगळ्यात आधी चाल लावली होती ती दशरथ पुजारी ह्यांनी आणि त्यांनीच त्यांच्या सुमधुर आवाजात हे गीत गायले होते. चालही खूप छान होती....पुढे श्रीनिवास खळे ह्यांनीही एक सुंदरशी चाल ह्या गीताला लावली आणि तेवढ्याच छान पद्धतीने सुरेश वाडकरांनी ती गायलेय....हल्ली दशरथ पुजारी ह्यांचे ते गीत कुठेच ऐकायला मिळत नाहीये...महाजालावर शोध घेऊनही ते मला सापडले नाही....त्यांनी लावलेल्या चालीतील फक्त पहिल्या ओळीचीच चाल मला आठवतेय..खूप प्रयत्न करूनही पुढची चाल मात्र आठवेना..म्हणून मग मी माझ्याच पद्धतीने हे गीत ’चाल’वण्याचे ठरवले....पहिल्या ओळीची चाल मात्र पुजारीसाहेबांचीच आहे.


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा


आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा


डोळे मिटून घेतो छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा ?


नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा ?


      कवी: मंगेश पाडगांवकर
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

हरिभजनाविण काळ



हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥


      रचना: संत सोहिरोबानाथ
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

योगी पावन मनाचा




योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्‍त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रह्म, दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

        रचना: संत ज्ञानेश्वर
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

कांदा मुळा भाजी




कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रताळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता ह्मणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥


      रचना: संत सावता माळी
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

पुण्य पर‍उपकार पाप ते




पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा ।
आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

सत्य तो ची धर्म, असत्य तें कर्म ।
आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥२॥

गति तेचि मुखीं नामाचें स्मरण ।
अधोगति जाण विन्मुखता ॥३॥

संतांचा संग तोचि स्वर्गवास ।
नर्क तो उदास अनर्गळा ॥४॥

तुका ह्मणे उघडें आहे हित घात
जया जें उचित करा तैसें ॥५॥

         रचना: संत तुकाराम
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

विठ्ठल विठ्ठल गजरी




विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

         रचना: संत चोखा मेळा
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा




रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्‍गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

         रचना : संत ज्ञानेश्वर
’चाल’क आणि गायक" प्रमोद देव