बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

नामाचा गजर गर्जे




नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महिमा साजे थोर तुज एका ॥१॥

रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥

चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
सनकादिक गातीं कीर्ति तुझी ॥३॥

सुरवरांचे भार अंगणीं लोळती ।
चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥

नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू ।
करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥

          रचना: संत नामदेव
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव


पंढरी निवासा



पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥

भक्त कैवारिया होसी नारायणा ।
बोलतां वचन काय लाज ॥२॥

मागें बहुतांचें फेडियलें ऋण ।
आह्मांसाठीं कोण आली धाड ॥३॥

वारंवार तुज लाज नाहीं देवा ।
बोलरे केशवा ह्मणे नामा ॥४॥

           रचना: संत नामदेव
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

आतां कोठें धांवे मन...





आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥

प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥

तुका ह्मणे आह्मां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥

         रचना: संत तुकाराम
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

सुंदर ते ध्यान






सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥


तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥


मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥


तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥



        रचना: संत तुकाराम
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

ज्ञानियांचा राजा






ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥

मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥

ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥

तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥


रचना: संत तुकाराम
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव

बुधवार, ४ मार्च, २०१५

वसुधातल रमणीय सुधाकर





वसुधातल रमणीय सुधाकर ।
व्यसन घनतिमिरि बुडविसी कैसा ?

सृजनि जया परमेश सुखावे ।
नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा ॥

गीतकार- विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत: गंधर्व नाटक मंडळी
नाटक: संगीत एकच प्याला
गायक: श्रीपादराव नेवरेकर, अजित कडकडे

सोमवार, २ मार्च, २०१५

रजनिनाथ हा नभीं उगवला

रजनिनाथ हा नभीं उगवला ।
राजपथीं जणुं दीपचि गमला ॥

नवयुवतीच्या निटिलासम किति ।
विमल दिसे हा ग्रहगण भोंवतीं ।
शुभ्रकिरण घन तिमिरीं पडती ।
पंकीं जेविं पयाच्या धारा ॥

गीतकार-संगीतकार: गोविंद बल्लाळ देवल
नाटक: मृच्छकटिक
गायक: छोटा गंधर्व