मंगळवार, ९ जुलै, २०१३

आज प्रीतिला पंख हे लाभले रे...





आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेउनी पाखरू चालले रे

उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्‍न सुखाचे
तुझी हो‍उनी आज मी राहिले रे

असा लाजरा, बावरा, प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे

दोन जिवांनी एक असावे
मस्त हो‍उनी धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: प्रभाकर जोग
गायक-गायिका: सुधीर फडके,आशा भोसले
चित्रपट: कुंकवाचा करंडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: