सोमवार, ३० जानेवारी, २०१२

सखि मंद झाल्या तारका...

पुन्हा एकदा नव्याने ध्वनीमुद्रण केलंय...ऐका आणि सांगा..काही प्रगती झालेय की अजून सुधारणेला वाव आहे?



सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का ?

हृदयात आहे प्रीत अन्‌ ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशील का ?

जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरिही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का ?

गीत: सुधीर मोघे
संगीत: राम फाटक
गायक: सुधीर फडके

स्वर आले दुरुनी...

सुधीर फडके ह्यांनी गायलेलं हे गीत इतकं अप्रतिम आहे की ते पुन:पुन्हा गावेसे वाटते...ह्या आधीही मी एकदोनदा प्रयत्न केलेला आहेच. त्यावेळी तो बराच तोकडा पडला होता असं मलाच वाटतंय...म्हणून आता पुन्हा एकदा नव्याने गातो आहे...प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनच्या रूळावरून मी माझी गाडी धावडवलेय...ह्यावेळी मी खूप काळजी घेऊन गाण्याचा प्रयत्न केलाय...आशा आहे की कानसेनांच्या किमान अपेक्षा तरी मी पूर्ण करू शकेन...आता तुम्ही ऐका आणि ठरवा काय ते!



स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍याचे
आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी


विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी


पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी  का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी ?

गीत: यशवंत देव
संगीत: प्रभाकर जोग
गायक: सुधीर फडके

रविवार, २९ जानेवारी, २०१२

गीत गाता हूँ मैं...

किशोरदाचे हे गाणे...
माझ्या आवडत्या अनेक गाण्यांपैकीच एक...माझ्या आवाजात कसं वाटतंय ते ऐकून सांगा.


गीत गाता हुँ मैं, गुनगुनाता हुँ मैं
मैंने हसने का वादा किया था कभी
इसलिये अब सदा मुस्कुराता हुँ मैं

ये मोहब्बत के पल कितने अनमोल हैं
कितने फुलोंसे नाजुक मेरे बोल हैं
सबको फुलोंकी माला पहनाता हुँ मैं
मुस्कुराता हुँ मैं

रोशनी होगी इतनी किसे थी खबर
मेरे मनका ये दर्पन गया हैं निखर
साफ अब हैं ये दर्पन दिखाता हुँ मैं
मुस्कुराता हुँ मैं

गीत: देव कोहली
संगीत: शंकर जयकिशन
गायक: किशोरकुमार
चित्रपट: लाल पथ्थर

तोच चंद्रमा नभात....

सुधीर फडके ह्यांच्या मधाळ आवाजातले हे गीत माझे अतिशय आवडते गीत आहे..ह्याच गीताने मी माझ्या नव्या ’मोद’गाणी ह्या जालनिशीचे उद्घाटन करत आहे...प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनला रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐका तर!


तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

सारे जरी ते तसेच धुंदि आज ती कुठे?
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळुनी भंगल्या सुरांतुनी

एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!


गीत:शांता शेळके
संगीत, गायक: सुधीर फडके