बुधवार, ८ जानेवारी, २०१४

प्रीतिच्या चांदराती...




प्रीतिच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना,
ये प्रिये !

फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला अधरी प्रीती फुले
हासते.... चांदणे !

सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मीलनाला नुरले काही उणे
हात दे, साथ दे !

गीतकार: शांताराम नांदगांवकर
संगीतकार: अनिल-अरूण
गायक: हेमंतकुमार

२ टिप्पण्या:

शैलेंद्र रघूनाथ साठे म्हणाले...

Hindi peksha Marathi ganyana jast nyaay deta.

प्रमोद देव म्हणाले...

:)
मराठी ही आपली मातृभाषाच असल्यामुळे तसे होत असावे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद राजाभाऊ.