रविवार, २९ एप्रिल, २०१२

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी...




नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे  सूर दाटले मुखी
अननुभुत माधुरी  आज गीत गायने

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

कोण बाई बोलले, वाणि ही प्रियंवदा
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा
कशास वेगळेपणा, जवळ ये विलासिनी

गीतकार: ग दि माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके आणि उषा अत्रे
चित्रपट: उमज पडेल तर

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

जे वेड मजला लागले...





जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?

मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणि बोलतो, शब्दात ते रंगेल का ?

हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ?

माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ?

गीतकार: डॉ. वसंत अवसरे(शांता शेळके)
संगीत: वसंत पवार
गायक-गायिका: सुधीर फडके आणि आशा भोसले
चित्रपट: अवघाचि संसार

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना ...



धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरुप आले, मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली

माळरानी या प्रीतीची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रुप या क्षणांना

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके आणि आशा भोसले
चित्रपट: धाकटी बहीण

चंद्र आहे साक्षिला...



पान जागे फुल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला

चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके आणि आशा भोसले
चित्रपट: चंद्र आहे साक्षीला

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

विसरशील खास मला...




विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचनें ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, वचन आठवीता

स्वैर तू विहंग, अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरीची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा

गीतकार: ज. के. उपाध्ये
संगीतकार: यशवंत देव
गायिका: आशा भोसले


सोमवार, २३ एप्रिल, २०१२

उठि श्रीरामा,पहाट झाली...



उठि श्रीरामा, पहाट झाली; पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा, कौसल्या माउली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे, दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले, गाऊन भूपाळी


काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा, सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदिरी दासी आल्या रत्‍नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

मेरे नैना सावन भादो...





मेरे नैना सावन भादो,
फिर भी मेरा मन प्यासा
फिर भी मेरा मन प्यासा

ऐ दिल दीवाने, खेल है क्या जाने
दर्द भरा ये, गीत कहांसे
इन होटोंपे आयेऽऽऽ, दूर कहीं ले जाये
भूल गया क्या, भूलके भी है
मुझको याद जरासा, फिर भी मेरा मन प्यासा

बात पुरानी है, एक कहानी है
अब सोचूं तुम्हें, याद नही है
अब सोचूं नहीं भूलेऽऽऽ, वो सावन के झूले
रूत आये रूत जाये देके
झुठा एक दिलासा, फिर भी मेरा मन प्यासा

बरसों बीत गये, हमको मिले बिछ्डे
बिजुरी बनके, गगनपे चमकी
बीते समयकी रेखाऽऽऽ, मैंने तुमको देखा
मन संग आंख-मिचौली खेले
आशा और निराशा, फिर भी मेरा मन प्यासा

गीतकार: आनंद बक्षी
संगीतकार: राहुलदेव बर्मन
गायक: किशोर कुमार
चित्रपट:  मेहबूबा

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

एक धागा सुखाचा!


प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा घेऊन येत आहे...माझे एक आवडते गीत.



एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे

या वस्त्रांते विणतो कोण,एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे

गीतकार: ग. दि. माडगूळकर 
संगीतकार: सुधीर फडके
गायक: सुधीर फडके
चित्रपट: जगाच्या पाठीवर