बुधवार, १५ जानेवारी, २०१४

राधा ही बावरी...



काका, तुम्ही नेहमी जुनीच गाणी गाता..कधी तरी आमच्यासाठी एखादे नवे गाणेही गा ना...अशी इच्छा माझ्या जालावरच्या एक-दोन पुतण्यांनी व्यक्त केली....म्हणून ही हिंमत करतोय...एरवी हे गाणं माझ्यासारख्या वयस्काच्या आवाजासाठी मुळीच नाहीये हे मलाही माहीत आहे..आता ऐका आणि गोड मानून घ्या.

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्याहिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतिचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणुचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

गीतकार आणि संगीतकार: अशोक पत्की
गायक: स्वप्नील बांदोडकर

२ टिप्पण्या:

शैलेंद्र रघूनाथ साठे म्हणाले...

प्रामाणिक प्रयत्न आवडला. आधी म्हटल्याप्रमाणेच हिंदी गाण्यांपेक्षा मराठी गाण्यांना तुम्ही जास्त चांगला न्याय देता हे परत एकदा सिद्ध झालं.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद राजाभाऊ!