शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

मान वेळावुनी धुंद बोलू नको...

गीतकार मंगेश पाडगांवकर, संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ह्या त्रयीचे हे एक सुंदर गाणे...रूळ मिळाला म्हणून मीही गाऊन घेतले....कृपा करून दातेसाहेबांच्या मुलायम आवाजाशी माझ्या आवाजाची तुलना न करता हे गीत ऐका आणि आपली प्रतिक्रिया द्या.


मान वेळावुनी धूंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं

आज वारा बने रेशमाचा झूला
ही खुशीची हवा, साद घाली तुला
मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे
रुप पाहून हे चंद्र भागेल गं
दृष्ट लागेल गं ...

पाहणे हे तुझे, चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
दृष्ट लागेल गं ...

गीत: मंगेश पाडगावकर
संगीत: यशवंत देव
गायक : अरूण दाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: