सोमवार, ३० जानेवारी, २०१२

सखि मंद झाल्या तारका...

पुन्हा एकदा नव्याने ध्वनीमुद्रण केलंय...ऐका आणि सांगा..काही प्रगती झालेय की अजून सुधारणेला वाव आहे?



सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का ?

हृदयात आहे प्रीत अन्‌ ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशील का ?

जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरिही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का ?

गीत: सुधीर मोघे
संगीत: राम फाटक
गायक: सुधीर फडके

1 टिप्पणी:

Jivanika म्हणाले...

काका, तुम्ही संगीताबरोबर आवाज कसा रेकॉर्ड करता? कोनात software वापरता का? मला पण रेकॉर्ड करायचा आहे माझा आवाज.
- Jivanika