सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

आकाशी झेप घे रे पाखरा...

आराम हराम आहे ह्या चित्रपटातील गीतकार जगदीश खेबूडकर ह्यांचे गीत,संगीतकार आणि गायक सुधीर फडके ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक....ऐका माझ्या आवाजात...रूळासंगे.



आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा  ||धृ.||

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा ॥४॥

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा ॥५॥

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत आणि गायक: सुधीर फडके
चित्रपट: आराम हराम आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: