कशी करू स्वागता
एकांताचा आरंभ कैसा ?
असते कशी सांगता ?
कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालू का
कवळू तुज नाथा ?
फुलते कळि की फुलवी वारा
चंद्र हसवि की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर
येई ना सांगता
कुणी न पुढती कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथमदर्शनी बोलायाचा
भाव तरी कोणता ?
गीतकार: ग.दि.माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायिका: सुमन कल्याणपूर
चित्रपट: मुंबईचा जावई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा