सुमन कल्याणपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुमन कल्याणपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

ना तुम हमे जानो...




ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने
मगर लगता हैं, कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया

ये मौसम ये रात चुप हैं
दो होठों की बात चुप हैं
खामोशी सुनाने लगी, हैं दास्ताँ
नजर बन गयी हैं, दिल की जबॉं

मोहब्बत के मोड़ पे हम
मिले सब को छोड़ के हम
धड़कते दिलों का लेके, ये कारवां
चले आज दोनों जाने कहा?

गीतकार: मजरूह सुलतानपूरी
संगीतकार: सचिन देव बर्मन
गायक-गायिका: हेमंत कुमार, सुमन कल्याणपूर
चित्रपट: बात एक रात की

मंगळवार, २३ जुलै, २०१३

झिमझिम झरती श्रावणधारा...




झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधे भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी
वर्षामागुन वर्षति नयने करती नित्‌ बरसात

गीतकार: मधुकर जोशी
संगीतकार: दशरथ पुजारी
गायिका: सुमन कल्याणपूर

गुरुवार, ११ जुलै, २०१३

कशी करू स्वागता...




कशी करू स्वागता
एकांताचा आरंभ कैसा ?
असते कशी सांगता ?

कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालू का
कवळू तुज नाथा ?

फुलते कळि की फुलवी वारा
चंद्र हसवि की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर
येई ना सांगता

कुणी न पुढती कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथमदर्शनी बोलायाचा
भाव तरी कोणता ?

गीतकार: ग.दि.माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायिका: सुमन कल्याणपूर
चित्रपट: मुंबईचा जावई

जिथे सागरा धरणी मिळते...





जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते..

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते

गीतकार: पी. सावळाराम
संगीतकार: वसंत प्रभू
गायिका: सुमन कल्याणपूर
चित्रपट: पुत्र व्हावा ऐसा गुंडा

रविवार, २ जून, २०१३

पहिलीच भेट झाली




पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्‍नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ?

डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्‍नी अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची

लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्‍ने ही मीलनाची

वार्‍यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
तार्‍यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

गीतकार - मंगेश पाडगावकर
संगीतकार- श्रीनिवास खळे
गायक-गायिका - अरुण दाते, सुमन कल्याणपूर