अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करु यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
रचनाकार: संत नामदेव
संगीतकार: बाळ माटे
गायिका: माणिक वर्मा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा