रविवार, १२ जानेवारी, २०१४

ओ दुनियाँ के रखवाले



ह्या जालनिशीसाठी गायलेले हे २०० वे गाणे आहे (ह्या जालनिशीत ’यारी है इमान मेरा’ हे एक गाणं माझे मित्र श्री. शैलेंद्र साठे ह्यांनी गायलेलंही सामील केलेलं आहे.)

नौशाद साहेबांचं जादूई संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा स्वर्गीय आवाज ज्या अनेक गाण्यांना लाभलाय त्यातले हे माझे सगळ्यात आवडते गाणे आहे...एक काळ असा होता की मी हेच गाणं, मूळ पट्टीत
(रफीसाहेबांनी गायलेल्या) गाऊ शकत होतो पण तेव्हा हे ध्वनीमुद्रणाचं तंत्र मला अवगत नव्हतं  आणि आज ते तंत्र काही प्रमाणात अवगत झालंय तर वयोमानानुसार आवाज मनासारखा काम देत नाहीये..पण  माझं आवडतं गाणं गाण्याची माझी इच्छा दूर्दम्य असल्यामुळे  गाण्याच्या मूळ पट्टीपेक्षा बर्‍याच खालच्या पट्टीत का होईना पण गाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे...तो कितपत जमलाय ते आता आपणच ठरवा.



ओ दुनियाँ के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले

आशा निराशा के दो रंगो से दुनियाँ तू ने बनाई
नैय्या संग तूफान बनाया, मिलन के साथ जुदाई
जा देख लिया हरजाई
लूट गयी मेरे प्यार की नगरी, अब तो नीर बहा ले

आग बनी सावन की बरखा, फूल बने अंगारे
नागण बन गयी रात सुहानी, पत्थर बन गये तारे
सब टूट चूके हैं सहारे
जीवन अपना वापस ले ले, जीवन देने वाले

चाँद को ढूँढे पागल सूरज, शाम को ढूँढे सवेरा
मैं भी ढूंढू उस प्रीतम को, हो ना सका जो मेरा
भगवान भला हो तेरा
किस्मत फूटी आस ना टूटी, पाँव में पड़ गये छाले 

महल उदास और गलिया सुनी, चूप चूप हैं दीवारे
दिल क्या उजड़ा, दुनियाँ उजड़ी, रूठ गयी हैं बहारे
हम जीवन कैसे गुज़ारे
मंदीर गिरता फिर बन जाता, दिल को कौन संभाले

गीतकार: शकील बदायुनी
संगीतकार: नौशाद
गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: बैजू बावरा

२ टिप्पण्या:

शैलेंद्र रघूनाथ साठे म्हणाले...

Prayatna changla aahe evadhach mhanen. He gane Shiv-dhanushya aahe. Tyamule tyala haat ghalanyachi himmat jaree dadkhavali taree kautukach aahe.

प्रमोद देव म्हणाले...

होय राजाभाऊ! तुम्ही म्हणता ते १००% खरंय...
हे शिवधनुष्यच आहे...आणि म्हणूनच त्याला हात घालण्याचा मोह मला सोडवला नाही.
खरं तर हे गाणंच नव्हे तर कोणतंही गाणं मूळ गायकाने ज्या पट्टीत गायलंय त्यापेक्षा खालच्या पट्टीत गायलं तर त्या गाण्याला तो उठाव येत नाही...हा माझा देखील स्वानुभव आहे आणि त्या दृष्टीने पाहता किमान ह्या जन्मात तरी आता हे गाणं, तशा पट्टीत गाणं मला शक्य होणे नाही हे निर्विवाद सत्य आहे.
तरीही जीव स्वस्थ बसत नाही म्हणून हा एक क्षीण प्रयत्न होता. :)