देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मुठीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही गीतकार:ग. दि. माडगुळकर संगीतकार आणि गायक:सुधीर फडके चित्रपट: झाला महार पंढरीनाथ
माझी,गाण्याची,स्वत:ची अशी वेगळी शैली आहे...आपल्याला आवडली तर आनंदच आहे...नाही आवडली तरी खंत नाही.
गुरुवार, ४ जुलै, २०१३
देव देव्हार्यात नाही....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा