जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते..
डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते
वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते
बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते
गीतकार: पी. सावळाराम
संगीतकार: वसंत प्रभू
गायिका: सुमन कल्याणपूर
चित्रपट: पुत्र व्हावा ऐसा गुंडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा