मंडळी इथे ह्या जालनिशीवर सादर केलेले हे माझे शंभरावे गाणे आहे.
ह्या जालनिशीची सुरुवात मी ज्यांच्या गाण्याने केली ते माझे सुगम संगीतातले आदर्श म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. सुधीर फडके.
महाकवी आणि गीत रामायणकार ग.दि. माडगूळकर विरचित ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ह्या गीताचे संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत स्वत: फडकेसाहेब....हे मी गायलेले गाणे, मी अतिशय विनम्रपणे ग.दि. माडगूळकर-सुधीर फडके ह्या अजरामर जोडीला अर्पण करत आहे.
इथे आजवर मी जी गाणी गायली ती गाण्यासाठी मला बहुतांशी मदत झाली ती सुप्रसिद्ध संगीतकार आणि वायोलिन वादक श्री.प्रभाकर जोग ह्यांच्या ’गाणारे वायोलिन’ची! त्याबद्दल मी त्यांचा शतश: ऋणी आहे.
मंडळी, गायक गातो आणि वाद्य त्याला साथ करतात...अशी सर्वसामान्य पद्धत आहे...पण मी काही खर्या अर्थाने गायक नाहीये...म्हणून मी वाद्यांच्या साथीने...म्हणजे त्यांच्या मागून गाण्याचा प्रयत्न करत असतो...त्यामुळे थोडेफार मागेपुढे होणे क्रमप्राप्त आहे...आपण सांभाळून घेता आहात म्हणूनच हे धाडस मी करतोय..हे वेगळे सांगायला नकोच. :)

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
गीतकार: ग.दि.माडगूळकर
संगीतकार आणि गायक: सुधीर फडके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा