स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी
हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी
या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी
एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द-सूर हे हार गुंफिले मी
घेशील का सख्या तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके,आशा भोसले
चित्रपट: आम्ही जातो आमुच्या गावा
२ टिप्पण्या:
beautiful rendition. enjoyed it thoroughly.
धन्यवाद अरूणाजी!
टिप्पणी पोस्ट करा