गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना ...



धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरुप आले, मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली

माळरानी या प्रीतीची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रुप या क्षणांना

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक-गायिका: सुधीर फडके आणि आशा भोसले
चित्रपट: धाकटी बहीण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: