मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

एक धागा सुखाचा!


प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा घेऊन येत आहे...माझे एक आवडते गीत.



एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे

या वस्त्रांते विणतो कोण,एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे

गीतकार: ग. दि. माडगूळकर 
संगीतकार: सुधीर फडके
गायक: सुधीर फडके
चित्रपट: जगाच्या पाठीवर

२ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

अतिशय उत्कृष्ट गायला आहात काका.. कमाल आहे तुमची. प्रोत्साहन आहे आमच्यासारख्यांना...

दीपिका जोशी

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद दिपुताई!
तुमच्या प्रतिक्रियेमुळे अजून उत्साह वाढलाय. :)