रविवार, २९ जानेवारी, २०१२

तोच चंद्रमा नभात....

सुधीर फडके ह्यांच्या मधाळ आवाजातले हे गीत माझे अतिशय आवडते गीत आहे..ह्याच गीताने मी माझ्या नव्या ’मोद’गाणी ह्या जालनिशीचे उद्घाटन करत आहे...प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनला रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐका तर!


तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

सारे जरी ते तसेच धुंदि आज ती कुठे?
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळुनी भंगल्या सुरांतुनी

एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!


गीत:शांता शेळके
संगीत, गायक: सुधीर फडके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: