सोमवार, ३० जानेवारी, २०१२

स्वर आले दुरुनी...

सुधीर फडके ह्यांनी गायलेलं हे गीत इतकं अप्रतिम आहे की ते पुन:पुन्हा गावेसे वाटते...ह्या आधीही मी एकदोनदा प्रयत्न केलेला आहेच. त्यावेळी तो बराच तोकडा पडला होता असं मलाच वाटतंय...म्हणून आता पुन्हा एकदा नव्याने गातो आहे...प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनच्या रूळावरून मी माझी गाडी धावडवलेय...ह्यावेळी मी खूप काळजी घेऊन गाण्याचा प्रयत्न केलाय...आशा आहे की कानसेनांच्या किमान अपेक्षा तरी मी पूर्ण करू शकेन...आता तुम्ही ऐका आणि ठरवा काय ते!



स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍याचे
आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी


विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी


पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी  का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी ?

गीत: यशवंत देव
संगीत: प्रभाकर जोग
गायक: सुधीर फडके

२ टिप्पण्या:

सुरेश पेठे म्हणाले...

स्वर आले ...दुरुनी, मधला पॉज थॊडा कमी असेल तर ?..बघा.
एक दोन ठिकाणी थोडीशी स्वरांची चलबिचल जाणवली प गाणॆ छान जमलंय!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद पेठेसाहेब!
आपल्या सुचनेची नोंद घेतलेय...पुन्हा प्रयत्न करेन तेव्हा नक्की अंमलबजावणी करेन.
आवाजावर नियंत्रण नसल्यामुळे मधेच होते चलबिचल..त्यावरच मात करायचा प्रयत्न करतोय...आपल्या सुचनांमुळे त्याकडे जरा अधिक लक्ष देण्यास नक्कीच प्रवृत्त होईन हे नक्की.