रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला !
रूपास भाळलो मी...
एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला !
रूपास भाळले मी....
हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून (२)
पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते सांगू नको कुणाला !
रूपास भाळलो मी...
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी ? (२)
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही ?
गालांत रंगले जे सांगू नको कुणाला !
रूपास भाळले मी, भुलले तुझ्या गुणाला
मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला !
रूपास भाळले मी
रूपास भाळलो मी
गीतकार: डॉ. वसंत अवसरे(शांता शेळके)
संगीतकार: वसंत पवार
गायक-गायिका: सुधीर फडके, आशा भोसले
चित्रपट: अवघाचि संसार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा