रविवार, १७ जून, २०१२

प्रभाती सूर नभी रंगती...




खरं तर ह्या गाण्याला माझा आवाज अजिबात पोषक नाहीये हे कळतंय..
पण मला हे गाणं आवडत असल्यामुळे मुद्दाम गायचा प्रयत्न केलाय मी.

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

पानोपानी अमृत शिंपित, उषा हासरी हसते धुंदित
जागी होऊन फुले सुगंधित, तालावर डोलती

कृषीवलाची हाक ऐकूनी, मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळविती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी, सडे शिंपिती मृदुल करांनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी, तार कुणी छेडिती

गीतकार : रमेश आणावकर
संगीतकार: वसंत प्रभू
गायिका: आशा भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: