मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हिरवेपण पिउनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू, हे फूल म्हणू की पाने
किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू, हे परीस म्हणू की सोने
का नकळत डोळे मिटती
स्पर्शात शहारे उठती
मी कशी भावना बोलू, हे शब्द म्हणू की गाणे
गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: प्रभाकर जोग
गायक-गायिका: सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल
चित्रपट: कैवारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा