चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !! ॥धृ.॥
गेले आंब्याच्या बनी
म्हंटली मैनेसवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे!
गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहभान रे!!
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया!
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम!!
हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघे जण रे!
जन विषयाचे किडे
ह्यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे!!
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी-चाफा? कोठे दोघे जण रे ?
गीतकार : बी(नारायण मुरलीधर गुप्ते)
संगीतकार: वसंत प्रभू
गायिका : लता मंगेशकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा