मनाच्या धुंदीत लहरीत ये ना
सखे गं साजणी ये ना
जराशी सोडून जनरीत ये ना
सखे गं साजणी ये ना
चांदणं रुपाचं आलय भरा
मुखडा तुझा हा अती साजरा
माझ्या शिवारी ये तू जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले गं तुझी वाट पाहुनी, ग ये
गुलाबी गालात हासत ये ना
सखे गं साजणी ये ना
जराशी लाजत मुरकत ये ना
सखे गं साजणी ये ना
आता कुठवर धीर मी धरू
काळीज करते बघ हुरुहुरू
सजणी नको ग मागं फिरू
माझ्या सुरात सुर ये भरू
माझे डोळे शिणले गं तुझी वाट पाहुनी, ग ये
बसंती वार्यात तोर्यात ये ना
सखे गं साजणी ये ना
सुखाची उधळीत बरसात ये ना
सखे गं साजणी ये ना
गीतकार: शांता शेळके
संगीतकार: देवदत्त साबळे
गायक: जयवंत कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा