प्रिया आज माझी नसे साथ द्याया,
नको धुंद वारे, नको चांदण्या या!
नको पारिजाता धरा भुषवू ही,
पदांची तिच्या आज चाहूल नाही,
प्रियेविण आरास जाईल वाया !
फुले सान झेलू तरी भार होतो,
पुढे वाट साधी तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या !
न शांती जीवाला न प्राणास धीर,
कसा आज कंठात येईल सूर,
उरी वेदना मात्र जागेल गाया!
अता आठवीता तशा चांद राती,
उरे मौक्तिकाविण शिंपाच हाती,
उशाला उभी ती जुनी स्वप्नामाया
गीतकार: यशवंत देव
संगीतकार: प्रभाकर जोग
गायक: सुधीर फडके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा