ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली
इथं कुणी आसपास ना
डोळ्याच्या कोनात हास ना
तू जरा माझ्याशी बोल ना
ओठांची मोहोर खोल ना
तू लगबग जाता मागं वळून पाहाता
वाट पावलात अडखळली
उगाच भुवई ताणून
फुकाचा रुसवा आणून
पदर चाचपून हातानं
ओठ जरा दाबीशी दातानं
हा राग जीवघेणा खोटा खोटाच बहाणा
आता माझी मला खूण कळली
गीतकार: शांता शेळके
संगीतकार: देवदत्त साबळे
गायक: जयवंत कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा