मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

रात्रीस खेळ चाले ...



रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा

या साजिर्‍या क्षणाला का आसवें दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा

गीतकार: सुधीर मोघे
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
गायक: महेंद्र कपूर
चित्रपट: हा खेळ सावल्यांचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: