घन रानी साजणा !
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे, सांग ना
घन रानी साजणा !
भिरभिर वार्याची
थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी
मनभर गाण्याची
तरी बाई सूर नवनवे
सुखद मधुर वाटतात हवे, या मना
घन रानी साजणा !
मधुमय समय असा
बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा
वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घालि कोण, यौवना ?
घन रानी साजणा !
किती अधिर अधिर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे, मन बोलत नाही ग माझे
किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन ग माझे
एक शपथ शपथ त्याला भीतीची
हृदया रे, अदया रे, बोल ना
घन रानी साजणा !
गीतकार: शांता शेळके
संगीतकार: श्रीधर फडके
गायिका आशा भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा